Tuesday, April 5, 2011

जीव रंगला!

चित्रपट : जोगवा
संगीत : अजय-अतुल

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तु,
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तु,
पैलतिरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तु,
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवचा चांद तु,

जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तु.

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी, रूजव्याची माती तु,
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढीचा ईटाळ, माझ्या लाख सजणा, ही काकणांची तोड माळ तु,
खुळं काळीज हे माझं तुला देईन मी आंदण,
तुझ्या पायावं माखेन माझ्या जन्माचं गोंदण,
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तु,
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तु,
पैलतिरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तु,
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवचा चांद तु,
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तु,
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा,
गहिवरला श्वास तु!

No comments:

Post a Comment